मराठी अभिनेता सचिन चांदवडेने गळफास घेत संपवले आपले आयुष्य

सोमवार, 27 ऑक्टोबर 2025 (15:39 IST)
मराठी अभिनेता सचिन चांदवडेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 23 ऑक्टोबर रोजी घडली आहे. अभिनेता जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील उंदीरखेडेच रहिवासी होता. 
 ALSO READ: 'पिंजरा' चित्रपटातील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन
सचिन ने राहत्या घरात वरच्या मजल्यावर असलेल्या खोलीत पंख्याला गळफास घेऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. त्याची प्रकृती नाजूक झल्याने त्याला तातडीनं धुळ्यातील रुग्णालयात रेफर  करण्यात आले. मात्र त्याने 24 ऑक्टोबर रोजी अखेरचा श्वास घेतला.त्याने आत्महत्या का केली अद्याप कळू शकले नाही. त्यांच्या मृत्यूने संपूर्ण मराठी कलाविश्वात शोककळा पसरली आहे. 
ALSO READ: अभिनेत्री अलका कुबल यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला
सचिन हा अभियंता असून पुण्यातील आयटीपार्क मध्ये नौकरीला होता. त्याला अभिनयाची आवड बालपणापासून असल्याने त्याने सिनेसृष्टीत पदार्पण केले. 
ALSO READ: पवित्रा रिश्ता मधील प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहेरेच्या वडिलांचे निधन
सचिन अभिनित चित्रपट असुरवन  लवकरच प्रदर्शित होणार होता. या व्यतिरिक्त त्याने जमतारा 2 या सिरीजमध्ये देखील काम केलं आहे. पोलीस   प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. 
Edited By - Priya Dixit
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती