टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहऱ्यांपैकी एक असलेल्या सोनारिका भदौरियाला परिचयाची गरज नाही. 'देवों के देव महादेव'मधील 'पार्वतीच्या भूमिकेनंतर ही अभिनेत्री घराघरात प्रसिद्ध झाली.सोनारिकाने 2022 मध्ये तिचा बॉयफ्रेंड विकास पाराशरसोबत एंगेजमेंट केली होती. आणि आता हे दोघेही लवकरच लग्नाच्या तयारीत आहेत. दरम्यान, दोघांची प्री-वेडिंगची तयारीही सुरू झाली आहे. या जोडप्याने लनाच्या आधी माता की चौकी पासून लग्नाचे कार्यक्रम सुरु केले.
सोनारिका भदौरियाने विकाससोबत तिच्या लग्नापूर्वी असा शुभ प्रसंग साजरा केल्याबद्दल आनंद व्यक्त केला.सोनालिका म्हणाली, 'माता की चौकी हे आमच्या लग्नाच्या विधींच्या दिशेने पहिले पाऊल आहे.या शुभ दिवशी माझे जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते.
अभिनेत्रीने सांगितले की, तिचे आणि विकास सवाईचे लग्न माधोपूरमध्ये होणार आहे. माता की चौकीनंतर मायरा विधी, त्यानंतर हळदी आणि संगीतासह कॉकटेल होणार असल्याचे तिने सांगितले.