सुकेशवर नोरा फतेहीचीच नव्हे तर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचीही फसवणूक केल्याचा आरोप आहे. नोरा फतेहीसोबत ईडीने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला पुन्हा बोलावले आहे. ईडीने जॅकलीनला एमटीएनएल येथील ईडी कार्यालयात उद्या म्हणजेच शुक्रवारी चौकशीत सामील होण्यासाठी बोलावले आहे. सुकेशने जॅकलिनलाही त्याच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला होता.