अभिनेत्री ट्विंकल खन्ना आणि खिलाडी अक्षय कुमार या दोघांनी काही दिवसांपूवीर्च कॉफी विथ करण या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. अनेकांनी ट्विंकल- अक्षच्या खास उपस्थितीत पार पडलेल्या या भागाला पसंत केले होते. असे असतानाच आता बी टाऊनचे मिस्टर अँड मिसेस खिलाडी लवकरच एका रिअॅलिटी शोच्या परीक्षकपदी दिसणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
त्यांच्यसमोर नच बलिये या डांस रिअॅलिटी शोच्या परीक्षकपदासाठीची भूमिका पार पाडण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याचे वृत्त बर्याच संकेतस्थळांनी प्रसिद्ध केले आहे. मात्र याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नच बलियेसाठीच्या परीक्षकदासाठी आलेला अक्षय आणि ट्विंकल या दोघांनीही प्रस्ताव नाकारला आहे. सध्यातरी हे खिलाडी जोडपे काही कामांसाठी आधीच दिलेल्या शब्दामुळे आणि व्यग्र वेळापत्रकामुळे नच बलियेच्या परीक्षकपदी दिसण्याच्या शक्यत कमी आहेत.