अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने यांच्या आई श्रीमती स्नेहलता दीक्षित यांचे आज सकाळी 8.40 वाजता निधन झाले. अशी माहिती माधुरी दिक्षिकचे कौटुंबिक सहकारी रिक्कू राकेश नाथ यांनी दिली. स्नेहलता दीक्षित यांचा घरीच नैसर्गिक मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. त्याचवेळी माधुरी दीक्षितनेही याबाबत दु:खद बातमी शेअर केली आहे. त्यांनी लिहिले, 'आमच्या प्रिय अाई स्नेहलता दीक्षित आज आमच्या मधून निघून गेल्या. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी 3वाजता वैकुंठ धाम, डॉ. ई. मोझेस रोड, जिजामाता नगर, वरळी मुंबई येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
माधुरी दीक्षित यांच्या आई श्रीमती स्नेहलता दीक्षित यांचे वय 91 वर्षे असल्याचे सांगितले जाते. आज सकाळी त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्रीच्या आईच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. माधुरी दीक्षित तिच्या आईच्या खूप जवळ होती. गेल्या वर्षी, अभिनेत्रीने जूनमध्ये तिच्या आईचा 90 वा वाढदिवस साजरा केला. आईच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्रीने तिचे अनेक फोटो शेअर केले होते. फोटोंसोबतच माधुरीने तिच्या आईसाठी एक हृदयस्पर्शी कॅप्शन लिहिले आहे. अभिनेत्रीने लिहिले- वाढदिवसाच्या शुभेच्छा.