कौन बनेगा करोडपतीच्या खेळात चक्क मांजरीची एन्ट्री

शनिवार, 2 नोव्हेंबर 2019 (09:39 IST)
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या 'कौन बनेगा करोडपती ११' या रिऍलिटी शोमध्ये सूत्रसंचालन करत हेत. आता या कौन बनेगा करोडपतीच्या प्रश्न उत्तरांच्या खेळात चक्क मांजरीची एन्ट्री झाली आहे. 
 
मांजरीचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यांनी ट्विटरच्या मध्यामातून या मांजरीचा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये त्या मांजरीसाठी एक कविता देखील लिहिली आहे. 'ऐ बिलौरी, बिल्ली बिल्ली, खेलन चली KBC,जैसे आइ Fastest Finger, लोट पोट हो गयी वहीं'.या अमिताभ बच्चन यांच्या पोस्टवर नेटकरी चांगल्याच प्रतिक्रिया देत आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती