इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत करण यश आणि रूहीसोबत पोज देताना दिसत आहे. तिघांनीही करण मल्होत्रा यांनी डिझाईन केलेली वस्त्रे परिधान केली आहेत.या सुंदर फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये करणने लिहिलंय, ”मी आणि माझ्या मुलांच्यावतीने तुम्हा सर्वांना दिवळीच्या शुभेच्छा. ”सध्या करण जोहर आगामी ‘सूर्यावंशी’, ‘दोस्ताना 2’ आणि पीरियड ड्रामा चित्रपट ‘तख्त’ याच्या कामात व्यग्र आहे.