— Anushka Sharma (@AnushkaSharma) October 31, 2019चहा प्रकरणावरून अनुष्का शर्माला ट्रोल करण्यात आलं होतं. त्यानंतर तिने ट्विटरवर आपली बाजू स्पष्ट केली आहे. अनुष्का शर्मा म्हणाली, "दृष्ट हेतूंनी हे आरोप केले जात आहेत. आपल्या सोयीप्रमाणे सत्य स्वीकारलं जातं. माझा पती विराटच्या कामगिरीबाबत मला नेहमीच दोषी ठरवण्यात आलं होतं. भारतीय क्रिकेटशी संबंधित गोष्टींसाठी विनाकारण मला दोषी सिद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात येतो," असं अनुष्का म्हणाली. ही बातमी द हिंदू या इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे.