इंदू सरकारला स्थगिती नाही

सोमवार, 24 जुलै 2017 (17:02 IST)

दिग्दर्शक मधुर भंडारकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. आणीबाणीच्या कालखंडावर आधारीत त्यांच्या इंदू सरकार चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांची मुलगी असल्याचा दावा करणाऱ्या प्रिया पॉल यांनी, मधुर भांडारकर यांच्या ‘इंदू सरकार’विरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेतली होती. 

‘इंदू सरकार’ या चित्रपटात काय सत्य आहे आणि काल्पनिक काय आहे, हे मधुर भांडारकर यांनी स्पष्ट करावे, असे प्रिया पॉल यांनी याचिकेत म्हटले आहे. काही दिवसांपूर्वीच मधुर भांडारकरांनी चित्रपटात दाखविण्यात आलेला आणीबाणीचा काळ सत्य असून, उर्वरित कथा काल्पनिक असल्याचे स्पष्ट केले आहे. चित्रपटाचा ३० टक्के भाग सत्यावर आधारित असून, ७० टक्के भाग काल्पनिक असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे हे नेमकेपणाने स्पष्ट करावे, असे प्रिया पॉल यांचे म्हणणे आहे. हा चित्रपट २८ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.

वेबदुनिया वर वाचा