इंडियन आयडलच्या12 व्या सीझनचा विजेता गायक पवनदीप राजन यांचा सोमवारी सकाळी अहमदाबादमध्ये मोठा अपघात झाला, ज्यामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली. सोशल मीडियावर या गायकाचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो गंभीर अवस्थेत दिसत आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर पवनदीपचे चाहते खूप चिंतेत दिसत आहेत.