या यशावर प्रतिक्रिया देताना वाणी म्हणाली,“बॉक्स ऑफिसवर यशस्वी होणं हे नेहमीच एक स्वप्नासारखं वाटतं. एखाद्या अशा चित्रपटाचा भाग होणं, जो प्रेक्षकांच्या हृदयाशी जोडला जातो, ही खूप समाधानाची गोष्ट आहे. रेड 2 ला मिळणारा सकारात्मक प्रतिसाद अत्यंत प्रेरणादायक आहे आणि मी या प्रवासाचा भाग असल्याबद्दल अत्यंत कृतज्ञ आहे.”
वाणी पुढे म्हणाली,“चित्रपटाची कथा खूपच ताकदीची आहे. राज कुमार गुप्ता सरांच्या दूरदृष्टीने दिग्दर्शित या प्रोजेक्टवर काम करणं माझ्यासाठी एक समृद्ध अनुभव होता. माझ्या भूमिकेसाठी मिळणाऱ्या कौतुकाबद्दल मी माध्यमांचे, समीक्षकांचे आणि प्रेक्षकांचे आभार मानते.”
ती पुढे म्हणाली,“अजय सर आणि राज कुमार गुप्ता सर यांच्यासोबत काम करताना मला एक कलाकार म्हणून खूप काही शिकायला मिळालं. 'रेड 2' चे यश माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. प्रेक्षकांपर्यंत पोहोचणाऱ्या प्रत्येक प्रोजेक्टमुळे मला अधिक मेहनत करायची प्रेरणा मिळते आणि सतत प्रगती करत राहायचं बळ मिळतं.