अभिनेता अनिल कपूर यांच्या आई निर्मल कपूर यांचे निधन

शनिवार, 3 मे 2025 (09:16 IST)
Bollywood News: अभिनेता अनिल कपूरची आई निर्मल कपूर यांचे वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले आहे. या दुःखद बातमीने कपूर कुटुंब आणि इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.
ALSO READ: कंगना राणौत दिल्लीतील सरकारी निवासस्थानी स्थलांतरित
मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी आली आहे. बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांच्या आई निर्मल कपूर यांचे वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले आहे. या दुःखद बातमीने कपूर कुटुंब आणि इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. निर्मल कपूर बऱ्याच काळापासून आजारी होत्या. शुक्रवार 2 मे रोजी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

निर्मल कपूर ह्या अनिल कपूर तसेच निर्माता बोनी कपूर आणि अभिनेता संजय कपूर यांची आई होती. त्यांच्या निधनाची बातमी मिळताच बॉलिवूड इंडस्ट्रीशी संबंधित अनेक स्टार्सनी शोक व्यक्त केला आहे. निर्मल कपूर यांचे लग्न १९५५ मध्ये प्रसिद्ध चित्रपट निर्माते सुरिंदर कपूर यांच्याशी झाले होते. त्यांना चार मुले आहे. ज्यामध्ये तीन मुलगे - बोनी कपूर, अनिल कपूर आणि संजय कपूर आणि एक मुलगी - रीना कपूर यांचा समावेश आहे. निर्मल कपूर ही सोनम कपूर, अर्जुन कपूर, जान्हवी कपूर आणि खुशी कपूर यांच्या आजी होत्या.

Edited By- Dhanashri Naik

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती