बरंय मला नवराच नाही...अन्यथा चितेमध्ये उडी घ्यावी लागली असते – तसलिमा नासरिन

Webdunia
अलीकडेच थोर समाज सुधारक राजा राम मोहन रॉय यांच्यावर वाईट शब्दात अवहेलना करुन वादात सापडलेल्या अभिनेत्री पायल रोहतगीचं नाव न घेता मुळची बांग्लादेशी ख्यातनाम लेखिका तसलिमा नासरिन यांनीही या वादात उडी घेतली आहे. 
 
तसलिमा नासरिन ह्यांनी ट्विट करत पायल रोहतगीवर टोळा मारत म्हटले आहे की बरयं मला नवरा नाही.
 
तसलिमा नासरिन यांनी ट्विट केले की असे ऐकण्यात आले आहे की सतीप्रथा पुन्हा सुरू व्हावी अशी काही भारतीय स्त्रियांची इच्छा आहे. हे खरंय का? बरंय की माझा नवराच नाही…त्यामुळे मला कोणीच पतीच्या चितेमध्ये उडी घेण्यासाठी जोर देऊ शकत नाही.
 

संबंधित माहिती

पुढील लेख