गली बॉय 'ऑस्कर'मधून बाहेर

गुरूवार, 19 डिसेंबर 2019 (12:11 IST)
झोया अख्तर दिग्दर्शित अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांचा 'गली बॉय' हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीमधून बाहेर पडला आहे. भारताकडून ऑस्करच्या सर्वोत्तम परदेशी भाषाचित्रपट विभागासाठी 'गली बॉय' चित्रपटाची निवड करण्यात आली होती. मात्र अ‍ॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट अँड सायन्सने जाहीर केलेल्या सर्वोत्तम दहा परदेशी भाषांमधील चित्रपटांच्या यादीमध्ये 'गली बॉय'ला स्थान मिळाले नाही. या शर्यतीमधून गली बॉय बाहेर पडला आहे. त्यामुळे पुन्हा भारतीय चाहत्यांचा हिरमोड झाला आहे. या यादीमध्ये द पेन्टेड बर्ड, ट्रूथ अ‍ॅण्ड जस्टिस, लेस मिसरेब्लस, दोज हू रीमेन्स, हनीलँड, कॉर्पस क्रिस्टी, बीनपोल, अटलांटिक्स, पॅरासाईट आणि पेन अ‍ॅण्ड ग्लोरी या चित्रपटांनी स्थान पटकावले आहे.
 
'गली बॉय' या चित्रपटात झोपडपट्टीत लहानाचा मोठा झालेला आणि आपल्या स्वप्नांसाठी धडपडणार 26 वर्षीय डिव्हाइन या प्रसिद्ध रॅपरची कथा दाखवण्यात आली आहे. मुंबईच्या चाळ संस्कृतीतून रॅपर्सच्या दुनियेत नावलौकिक मिळवणार्‍या 'डिव्हाइन' म्हणजे विवियन फर्नांडिस आणि 'रॅपर नॅझी' म्हणजेच नावेद शेख यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटनांपासून 'गली बॉय'च्या कथानकासाठी प्रेरणा घेण्यात आली आहे. चित्रपटातील रणवीर व आलियाच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती