Cool places to visit in summer उन्हापासून सुटका मिळवण्यासाठी काही 'थंडगार' पर्यटनस्थळे
शुक्रवार, 27 फेब्रुवारी 2026 (07:30 IST)
India Tourism : उन्हाळ्याची चाहूल लागली असून अनेक जण उन्हाळयाच्या सुट्टीमध्ये फिरायला जातात. तसेच उन्हाळ्याच्या कडाक्याच्या उन्हापासून सुटका मिळवण्यासाठी आणि मन प्रसन्न करण्यासाठी काही 'थंडगार' पर्यटनस्थळे आज आपण पाहणार आहोत. जिथे तुम्ही नक्कीच भेट देऊ शकतात.
उत्तर भारतातील बर्फाळ आणि अतिथंड ठिकाणे
जर तुम्हाला उन्हाळ्यातही स्वेटर घालावा लागेल इतकी थंडी हवी असेल, तर ही ठिकाणे सर्वोत्तम आहे.
लेह-लडाख (लडाख)
येथील निळे पांगॉन्ग सरोवर आणि बर्फाच्छादित डोंगर उन्हाळ्यात अतिशय सुंदर दिसतात. साहसी लोकांसाठी हे नंदनवन आहे.
मनाली आणि सिमला (हिमाचल प्रदेश)
रोहतांग पासमध्ये तुम्हाला उन्हाळ्यातही बर्फ पाहायला मिळू शकतो. कुटुंबासोबत जाण्यासाठी हे लोकप्रिय ठिकाण आहे.
गुलमर्ग (काश्मीर)
याला 'फुलांचे मैदान' म्हणतात. येथील 'गोंडोला राईड' (केबल कार) जगातील सर्वात उंच राईड्सपैकी एक आहे.
औली (उत्तराखंड)
येथील उंच डोंगररांगा आणि ओकची झाडे तुम्हाला स्वित्झर्लंडची आठवण करून देतील.