Comedy Actor Seshu Passed Away :साउथ इंडस्ट्रीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. दक्षिणेतील लोकप्रिय कॉमेडी अभिनेता शेषू यांचे निधन झाल्याचे वृत्त आहे. चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 60 व्या वर्षी या अभिनेत्याच्या आकस्मिक निधनाच्या बातमीने संपूर्ण साउथ इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.शेषू यांची प्रकृती अनेक दिवसांपासून खालावली होती आणि त्यांच्यावर चेन्नईतील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते
वृत्तानुसार, 15 मार्च रोजी शेषू यांना हृदयविकाराचा झटका आला होता, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आजारातून ते बरे होऊ शकले नाहीत आणि २६ मार्च रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर त्यांचे चाहते आणि सिनेविश्वातील सहकलाकार सोशल मीडियावर शोक व्यक्त करत आहेत.
लोकप्रिय अभिनेता धनुषच्या 'थुल्लूवधो इलामाई' या चित्रपटातून पदार्पण केले होते. यानंतर त्यांना लोकप्रिय टीव्ही कॉमेडी शो 'लोल्लू सभा'मध्ये काम करण्याची संधी मिळाली जी त्यांची खरी ओळख बनली. शेषूने अनेक साऊथ चित्रपटांमध्ये काम केले आहे. ज्यामध्ये 'गुलु गुलू', 'नई सेकर रिटर्न्स', 'बिल्डअप', 'ए1', 'डिक्किलुना', 'द्रौपती' आणि 'वडक्कुपट्टी रामासामी' यांसारख्या चित्रपटांच्या नावांचा समावेश आहे.