देशभरात नवरात्रोत्सवाची धूम सुरू आहे. गरब्याचा उगम गुजरातमधून झाला असला तरी तो नवरात्रीच्या काळात संपूर्ण भारतात साजरा केला जातो. गरबा गाणी वाजली की लोकांचे पाय आपसूकच टपायला लागतात. गरब्याचं नाव घेताच सगळ्यात पहिली गोष्ट डोळ्यासमोर येते ती म्हणजे 'गरबा क्वीन' फाल्गुनी पाठक. फाल्गुनी पाठकच्या गाण्याशिवाय गरबा अपूर्ण वाटतो. नवरात्रीदरम्यान, दांडिया क्वीन फाल्गुनी पाठक देखील अनेक ठिकाणी थेट कार्यक्रमांमध्ये गाते.
54 वर्षीय फाल्गुनी पाठक नवरात्रीच्या नऊ दिवसांत खूप कमाई करतात. या काळात देशाच्या विविध भागांतून नवरात्रोत्सवासाठी फाल्गुनीला बोलावले जाते. 'गरबा क्वीन' यासाठी भरघोस शुल्कही आकारते.एका रिपोर्टनुसार, फाल्गुनी एका रात्रीच्या शोसाठी सुमारे 20 लाख रुपये घेते.
गरबा क्वीन' फाल्गुनी पाठकने 1988 साली तिच्या गाण्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिने 'चुरी जो खानकी', 'मेरी चुनर उद उद जाये' आणि 'मै पायल है छनकाई' सारखी अनेक अप्रतिम गाणी गायली आहेत. आजही त्यांची गाणी प्रेक्षकांना खूप आवडतात. त्यांची गरबा गाणी सर्वाधिक प्रसिद्ध आहेत. त्यांची ही गाणी नवरात्रीच्या दिवसात खूप ऐकायला मिळतात.
एका संवादादरम्यान दांडिया क्वीन फाल्गुनी पाठकने बॉलीवूडमध्ये जाण्याविषयी सांगितले होते. ती म्हणाली होती, 'मी बॉलिवूडला कधीच गांभीर्याने घेतले नाही. मला ऑफर्स आल्या पण मला माझे शो आणि अल्बम करताना खूप आनंद होतो