गानसम्राज्ञी लता मंगेशकर कोरोनामुक्त ;आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

रविवार, 30 जानेवारी 2022 (13:10 IST)
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोना व्हायरसची लागण झाली होती आणि त्यांना संसर्गाची सौम्य लक्षणे होती. त्यांना 8 जानेवारी रोजी दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आले होते, जिथे त्यांच्यावर डॉ. प्रतिक समदानी आणि डॉक्टरांचे पथक उपचार करत आहेत. समदानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेशकर यांच्या प्रकृतीत किंचित सुधारणा होण्याची चिन्हे आहेत.
लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण लागली होती. त्यांच्यावर उपचार सुरु आहे. आता त्या कोरोनामुक्त झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. 
ते म्हणाले - की दीदी आता कोरोनामुक्त झाल्या असून त्यांच्या प्रकृतीमध्ये देखील किंचित  सुधारणा आहे. त्यांना आता व्हेंटिलेटर वरून काढण्यात आले आहे.त्यांनी डोळे उघडले असून त्या थोडं थोडं बोलत आहे. त्या न्यूमोनिया आणि कोरोनाच्या विळख्यात सापडल्या होत्या. त्यांच्यावर सध्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहे. योग्य डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करत असून लता दीदी उपचाराला प्रतिसाद देत आहे. सध्या त्यांना खूप अशक्तपणा आहे. त्या डॉक्टरांच्या देखरेखी खाली आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती