India Tourism : अहिल्याबाई होळकरांची राजधानी महेश्वर मध्य प्रदेशातील नर्मदा नदीच्या काठावर स्थित आहे, ज्याला 'मध्य भारतातील वाराणसी' म्हणून संबोधले जाते. महेश्वर हे पूर्वी मालवा साम्राज्याच्या राणी अहिल्याबाईंच्या होळकर राज्याची राजधानी होती, त्यामुळे येथील अनेक इमारती आणि सार्वजनिक बांधकामे मराठा वास्तुकलेचे प्रतिबिंब आहे.
तसेच महेश्वर हे भगवान शिव यांना समर्पित एक छोटे शहर आहे. असे म्हटले जाते की हे पवित्र शहर एकेकाळी हिंदू भक्तांसाठी प्रमुख आध्यात्मिक केंद्रांपैकी एक होते. आजही, आध्यात्मिक अनुभव घेणाऱ्यांसाठी महेश्वर एक प्रमुख आकर्षण आहे. अध्यात्माव्यतिरिक्त, महेश्वरी हे साड्या उत्पादनासाठी एक प्रसिद्ध केंद्र आहे, ज्यामुळे हे ठिकाण खरेदीसाठी स्वर्ग बनते.
महेश्वरमधील एका कड्याच्या काठावर असलेला अहिल्या किल्ला महेश्वरच्या आकर्षणांपैकी एक आहे. हा किल्ला २५० वर्षे जुना आहे ज्याला होळकर किल्ला असेही म्हणतात. हा किल्ला त्याच्या ऐतिहासिक महत्त्वासाठी प्रसिद्ध आहे, कारण हा किल्ला १७६६ ते १७९५ दरम्यान मराठा राणी अहिल्याबाई होळकर यांची राजधानी होती. अहिल्या किल्ल्याच्या माथ्यावरून संपूर्ण महेश्वर शहराचे आणि घाटांचे अद्भुत दृश्य पाहता येते, जे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. महेश्वरला भेट देताना अनेकदा पर्यटक नैसर्गिक सौंदर्याने भरलेल्या शहराचे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी येथे यायला आवडतात.
तसेच महेश्वरला कवेत घेऊन नर्मदा येथून जाते. या नदीवर बांधलेले घाट देखणे आहे. पेशवा घाट, फणसे घाट, अहिल्या घाट हे प्रसिद्ध घाट आहे. तसेच महेश्वरातील मंदिरेही प्रसिद्ध आहे. कालेश्वर, राजराजेश्वर, विठ्ठलेश्वर व अहिल्येश्वर ही मंदिरे खासकरून पाहण्यासारखी आहे. मंदिरावरची नक्षी, त्यामागील कल्पना या सगळ्या गोष्टी खरोखरच देखण्या आहे. तसेच महेश्वर हे मराठी मनांसाठी अभिमानस्पद असं गाव आहे.