बाहुबली-२ चा मार्ग मोकळा, सत्यराज यांनी माफी मागितली

शुक्रवार, 21 एप्रिल 2017 (21:02 IST)

अखेर बाहुबली-२ ला वाचवण्यासाठीअभिनेते सत्यराज यांनी शरणागती स्‍वीकारत माफी मागितली आहे. नऊ वर्षापूर्वी कावेरी पाणी वाटप प्रश्‍नावर सत्यराज यांनी प्रतिक्रिया दिली होती. या विवादास्‍पद प्रतिक्रियेमुळे कन्‍नड संघटनांनी बाहुबली-२ च्या प्रदर्शनाला विरोध दर्शवला होता.यामुळे सत्यराज यांनी या प्रकरणी एक पाऊल मागे घेत म्‍हटले की, 'मी कर्नाटकाच्या विरोधात नाही. मी नऊ वर्षापूर्वी दिलेल्या प्रतिक्रियेबद्‍दल माफी मागतो.' असे सांगितले आहे. साल २००८ मध्ये सत्यराज यांनी तमिळ शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ भाषण केले होते. यावेळी विवादास्‍पद टिपण्‍णी केल्याने कन्‍नड संघटना माफीची मागणी करत होत्या.सत्यराज यांनी माफी मागितली नाही तर कर्नाटकात चित्रपट प्रदर्शीत होऊ दिला जाणार नाही अशी आक्रमक पवित्रा कन्‍नड संघटनांनी घेतला होता. 

वेबदुनिया वर वाचा