आयुष शर्माने 'अंतिम'मधल्या 'भाई का बर्थडे' या गाण्याचे जयपुरमध्ये केले अनावरण!
मंगळवार, 2 नोव्हेंबर 2021 (17:45 IST)
काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या 'विघ्नहर्ता' या संगीत क्रमांकाच्या अभूतपूर्व यशानंतर, अंतिम: द फायनल ट्रूथचे निर्माते 'भाई का बर्थडे' सोबत पुन्हा एकदा चार्टवर येण्यासाठी सज्ज झाले आहेत. निर्मात्यांनी आज जयपूरच्या राज मंदिर थिएटरमध्ये हे गाणे चाहत्यांना रिलीज केले. चित्रपटातील गँगस्टर आयुष शर्मावर हे गाणे चित्रित करण्यात आले आहे आणि हा दिवस ज्या टोळीचा आयुष एक भाग आहे त्या म्होरक्याचा वाढदिवस आहे आणि हा दिवस देसी शैलीत आयुषच्या देसी डान्स मूव्हसह साजरा केला जात आहे.
नृत्यदिग्दर्शक मुदस्सर यांनी कोरिओग्राफ केलेल्या डान्स मूव्ह्ससह, गाण्याचे व्हिज्युअल सुंदर झाले आहे जे चाहत्यांसाठी निःसंशयपणे एक मेजवानी ठरेल. संगीत खूप आकर्षक आणि डान्स नंबर निःसंशयपणे देशातील आगामी वाढदिवसाच्या मेजवानीसाठीची शान ठरणार असून प्रियजनांच्या वाढदिवसासाठीच्या गाण्यांच्या यादीत एका नवीन गाण्याची भर पडली आहे.
हे गाणे १ नोव्हेंबर रोजी रिलीज करण्यात आले. गाणे रिलीज करण्यासाठी, आयुषने जयपूर राजमंदिर सिंगल-स्क्रीन थिएटरला भेट दिली, जे भारतातील सर्वात मोठ्या सिंगल-स्क्रीन थिएटरपैकी एक आहे, जिथे तो त्या सर्व चाहत्यांना भेटला ज्यांचा वाढदिवस नोव्हेंबरमध्ये येतो.
गाण्याबद्दल बोलताना आयुष शर्माने शेअर केले की, "भाई का बर्थडे हे गाणे खूप मस्त, सेलिब्रेट करण्यासारखे गाणे आहे. जेव्हा सगळे मित्र एखाद्या सेलिब्रेशनसाठी एकत्र येतात, तशा खूप खऱ्या आणि वास्तविक भावना यात आहेत. मी याचे शूटिंग करताना खूप एन्जॉय केले आहे. विशेषतः डान्स स्टेप्स जे पूर्णपणे रॉ आणि देसी आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, गाणे चित्रपटात एक अतिशय मनोरंजक ट्विस्ट घेऊन येते, ज्यामुळे ते प्रत्यक्ष पाहण्यासारखे आणि मनोरंजक आहे.
हे गाणे हितेश मोडक यांनी संगीतबद्ध केले असून, बैकग्राउंड वोकल्स साजिद खान यांनी केले आहे. रवी बसरूर यांच्या एडिशनल प्रोग्रामिंग सोबत नृत्यदिग्दर्शन मुदस्सर यांचे आहे.
ट्रेलर रिलीजला मिळत असलेला उदंड प्रतिसाद लक्षात घेता, प्रेक्षक निःसंशयपणे जवळच्या चित्रपटगृहांमध्ये चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
हा चित्रपट 26 नोव्हेंबरला झी स्टूडियोज द्वारा थिएटर्समध्ये ग्लोबली प्रदर्शित होणार आहे.
सलमान खान, आयुष शर्मा आणि महिमा मकवाना मुख्य भूमिकेत असलेल्या 'अंतिम: द फाइनल ट्रुथ' या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे. हा चित्रपट सलमा खान द्वारे निर्मित आणि सलमान खान फिल्म्स द्वारे प्रस्तुत करण्यात आला आहे.