काय आर्यन खान खरोखर नोरा फतेहीला डेट करत आहे का?

बुधवार, 4 जानेवारी 2023 (15:02 IST)
बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अनेकदा चर्चेत असतो. ड्रग्ज प्रकरणात नाव आल्यानंतर आर्यन खानला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. या प्रकरणात क्लीन चिट मिळाल्यानंतर आर्यन आपल्या आयुष्यात पुढे गेला आहे.
 
यापूर्वी आर्यन खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्याची घोषणा केल्याने तो चर्चेत आला होता. याशिवाय तो आपला व्यवसायही सुरू करणार आहे. त्याचवेळी आर्यन खान त्याच्या डेटिंगच्या बातम्यांमुळे चर्चेत आला आहे. नोरा फतेहीचे नाव आर्यन खानसोबत सोशल मीडियावर जोडले जात आहे.
 
बॉलिवूडचा किंग खानचा मुलगा आर्यन खान डान्सिंग दिवा नोरा फतेहीला डेट करत असल्याचं बोललं जात आहे. खरंतर आर्यन आणि नोराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये ते एकत्र नसले तरी त्यांच्यात एक गोष्ट समान आहे.
 
फोटोंमध्ये त्याच चाहत्याने आर्यन खान आणि नोरा फतेहीसोबत फोटो क्लिक केले आहेत. यानंतर लोकांनी असा अंदाज लावला की नोरा आणि आर्यन एकमेकांना डेट करत आहेत आणि गुपचूप एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत.
 
बातम्यांनुसार, व्हायरल होत असलेले हे फोटो दुबईतील आहेत, जिथे आर्यन खानने न्यू इयर पार्टी केली होती. या पार्टीत बी-टाऊनचे अनेक स्टार्स उपस्थित होते. मात्र आर्यन आणि नोराच्या डेटिंगच्या बातम्यांमध्ये कितपत तथ्य आहे हे येणारा काळच सांगेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती