आलिया भट्टने कॅटरीना कैफ, दीपिका पादुकोण, जॅक्लीन फर्नांडीज, अदिती राव हैदरी, दिशा पटानी आणि श्रद्धा कपूर सारख्या नायिकांना 2018च्या मोस्ट डिजायरेबल महिलांच्या यादीत मागे टाकले आहे. दीपिका पादुकोणने 2017 च्या मोस्ट डिजायरेबल महिलांच्या यादीत शीर्ष स्थान मिळविले होते, पण या वर्षी आलियाने या किताबावर आपला कब्जा केला आहे.
'द टाइम्स मोस्ट डिजायरेबल वूमन'च्या लिस्टमध्ये तिसर्या नंबरवर कॅटरीना कैफ, चवथ्या नंबरावर दीपिका पादुकोण, सहाव्या क्रमांकावर अदिती राव हैदरी, आठव्या नंबरावर जॅक्लीन फर्नांडिस, नवव्या क्रमांकावर दिशा पाटनी आहे. या यादीत त्याच महिलांना सामील करण्यात येतात ज्यांनी सेक्स अपील, ऍटिट्यूड आणि टॅलेंटच्या बळावर आपल्या क्षेत्रात नाव आणि प्रसिद्धी मिळवली आहे.