अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने मनी लाँड्रिग प्रकरणी ईडीकडे केला हा खुलासा

गुरूवार, 25 ऑगस्ट 2022 (21:28 IST)
गेल्या अनेक दिवसांपासून मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस चर्चेत आहे. तिची ईडी अधिकाऱ्यांकडून चौकशीदेखील सुरु असून, मी माझ्या कष्टाने पैसे कमावले आहेत, असं स्पष्टीकरण तिने दिलं आहे. जॅकलिन ईडीकडे काय खुलासा करते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. आता अखेर तिने ईडीसमोर तिचे म्हणणे मांडले आहे.
 
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही गेल्या अनेक दिवसांपासून मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकली आहे. ईडीने नुकत्याच दाखल केलेल्या आरोपपत्रात जॅकलिनच्या नावाचादेखील समावेश आहे. त्यामुळे तिच्या अडचणीत वाढ झाली आहे. “माझ्याकडे जेवढी बचत असून ती वैध आहे व त्याचा या प्रकरणाशी संबंध नाही. माझ्या बँकांमधील फिक्स्ड डिपॉजिटची रक्कमदेखील अनेक वर्षांपासून आहे. त्यावेळी मी मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखर याला ओळखत देखील नव्हते”, असंही तिने म्हटले आहे.
 
गेल्या वर्षी ईडीकडे नोंदवलेल्या जबाबात तिने म्हटलं होतं की, तिला सुकेशने गुची आणि शनेलच्या डिझायनर बॅग आणि कपडेदेखील दिले होते. इतकंच नव्हे तर तिला चंद्रशेखरकडून बहुरंगी दगडांचे ब्रेसलेट आणि दोन हर्मीस ब्रेसलेटदेखील मिळाले होते. या शिवाय सुकेशने तिला मिनी कूपर कारही भेट दिली होती, पण तिने ती परत केल्याचे ईडीला सांगितले होते. सुकेश चंद्रशेखरने जॅकलिन फर्नांडिसच्या वतीने एका पटकथा लेखकाला तिच्या वेब सीरिजच्या प्रोजेक्टसाठी आगाऊ रक्कम म्हणून १५ लाख रुपये दिले होते

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती