'टॉयलेट' ची गोष्ट उचलेगिरी केल्याचा आरोप

गुरूवार, 6 जुलै 2017 (12:16 IST)

अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकरच्या “टॉयलेट, एक प्रेमकथा’ची गोष्ट उचलेगिरी केल्याचा आरोप डॉक्‍युमेंटरी फिल्मचे निर्माते प्रविण व्यास यांनी हा आरोप केला आहे. 2016 साली आपली डॉक्‍युमेंटरी “मानिनी’वरून “टॉयलेट…’ची कथा उचलल्याचा आरोप व्यास यांनी केला आहे. यामुळे विनाकारण “टॉयलेट…’ अडचणीत आले आहे. हा आरोप हास्यास्पद आणि निव्वळ उल्लू बनवण्याचा प्रयत्न असल्याचे “टॉयलेट…’चे लेखक सिद्धार्थ आणि गरिमा यांनी म्हटले आहे.

“टॉयलेट…’च्या कथेचे फिल्म रायटर्स असोसिएशनकडे ऑगस्ट 2014 मध्येच रजिस्ट्रेशन झाले आहे. नीरज पांडे यांनी 2013 सालीच आम्हाला या कथा सूत्रावर कथा लिहिण्यास सांगितले होते. डिसेंबर 2013 पासून आम्ही या कथेवर काम करत आहोत, असे गरिमा यांनी सांगितले. अशाच स्वरुपाची घटना पूर्वी घडलेली होती. त्याच्यात विस्तार करून चित्रपटासाठी कथा लिहिली गेली आहे. त्यासाठी मथुरा, नंदगाव, बरसणा, झांसी आणि बहाराईच सारख्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष अनुभवाच्या आधारे ही कथा लिहील्याचे सिद्धार्थ यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा