मुंबई मनपात शिवसेना-राष्ट्रवादी युतीचे संकेत सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यानंतर युतीची चर्चा

गुरूवार, 19 मे 2022 (07:38 IST)
ज्या जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे त्या ठिकाणी निवडणुका घेण्यास काय हरकत आहे? असा सवाल करून जिल्हानिहाय आढावा घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. दुसरीकडे धुळ्यात सुप्रिया सुळे यांनी मुंबई महापालिकेत  शिवसेनेची सत्ता येणार असल्याचे वक्तव्य केले. यामुळे मुंबई मनपा निवडणुकीचे पडघम वाजत असतांना शिवसेना राष्ट्रवादीची मनपात युती होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
 
राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे मंगळवारी म्हटलं की, मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा एकदा शिवसेनेची सत्ता येईल. यामुळे मनपात शिवसेनेचा महापौर असणार आहे. कोरोना काळामध्ये मुंबई मनपाने केलेल्या कामगिरीमुळे शिवसेनाच सत्तेत येईल.
 
शिवसेना आणि राष्ट्रवादी युती ?
 
सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यानंतर मुंबई महापालिकेत शिवसेना-राष्ट्रवादी युती होणार का? असी चर्चा सुरु आहे. मनपात एकूण 236 वॉर्ड आहेत. बहुमतासाठी 114 जागांची गरज आहे. गेल्या 25 वर्षांपासून मनपात सत्तेत असणाऱ्या शिवसेनाला मागील निवडणुकीत स्वळावर सत्ता मिळवता आली नाही. शिवसेनेचे 97 नगरसेवक निवडून आले तर राष्ट्रवादीचे आठ नगरसेवक आहेत. युती झाली तर शिवसेना 180 ते 190 जागांवर निवडणुका लढवणार तर राष्ट्रवादी 40 ते 50 जागांवर लढवेल. मुंबईत राष्ट्रवादीचा फारसा प्रभाव नसल्याने अमराठी जागा राष्ट्रवादीला देण्यावर शिवसेनेचा भर असेल. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतल्यामुळे मुस्लीमबहुल भागामध्ये शिवसेनेला फायदा होऊ शकतो. दोन्ही पक्ष एकत्र आली तर विविध विकासाच्या आणि राजकीय मुद्द्यांवर देखील स्थानिक पातळीवर भाजप तसेच इतर मित्रपक्षांना शह देता येईल, असा देखील राजकीय जाणकार सांगतात.
 
मुंबई महापालिकेतील पक्षीय बलाबल
 
शिवसेना – 97
 
भाजप – 83
 
काँग्रेस – 29
 
राष्ट्रवादी – 8
 
समाजवादी पक्ष – 6
 
मनसे – 1
 
एमआयएम – 2
 
अभासे – 1
 
एकूण – 227
 
बहुमताचा आकडा – 114

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती