काँग्रेस स्वबळावर लढवणार मुंबई मनपा निवडणूक

मंगळवार, 7 जून 2022 (12:14 IST)
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार असल्याचे समजते. पनवेल येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने दोन दिवशीय कार्यकर्ता शिबाराचे आयोजन करण्यात आले ज्यात काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आगामी निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे. काँग्रेस नेते भाई जगताप आणि बाळासाहेब थोरात यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याचे आवाहन केले आहे.
 
काँग्रेस पक्ष स्वबळावर मुंबईत लढून आपलाच महापौर बनवणार असल्याचे भाई जगताप म्हणाले. दोन दिवसीय  शिबीरात प्रामुख्याने महापालिका निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती