होळी, धुळवडचा सण देशभरात साजरा केला जातो. पण उत्तरप्रदेशच्या ब्रजमध्ये या सणाचा एक वेगळाच उत्सव पहायला मिळतो. मथुरा, वृंदावन, गोवर्धन, गोकुळ, नंदगांव आणि बरसाना मध्ये खूप उत्साहात धुळवड साजरी केली जाते. तसेच लोक दुरून दुरून येथे रंग खेळायला येतात. या वेळेस मथुरा-वृंदावन मध्ये रंग खेळायचा प्लॅनींग करत असाल तर काही गोष्टींची काळजी घ्यावी.
पहिल्यापासूनच करा बुकिंग-
ब्रजमध्ये धुळवडला दुरून दुरून लोक येतात. जर तुम्ही जायचे प्लॅनींग करत असाल तर आपल्या हॉटेलची बुकिंग आधीच करून घ्या, असे देखील होऊ शकते गर्दीमुळे हॉटेल मध्ये जागा नसावी.
खायच्या वस्तु सोबत घेऊन जा-
धुळवड मुळे कदाचित तुम्हाला हॉटेलमध्ये रांगेत उभे राहवे लागेल. म्हणून काळजी पूर्वक खायच्या वस्तु सोबत घेऊन जा.
महागातल्या वस्तु घेऊन जाऊ नका सोबत-
बज्रच्या धुळवड मध्ये लोक दुरून दुरून येतात. तसेच मंदिरामध्ये खूप गर्दी असते. म्हणून प्रयत्न करा की, सोबत महाग वस्तु घेऊन निघू नका. जर सोन्याच्या वस्तु घातल्या असतील तर त्या काढून ठेवा मग जा.