आशियातील सर्वोच्च शिवमंदिर हिमाचल प्रदेशच्या सोलनमध्ये स्थित आहे, ज्याला देवभूमी म्हणतात, हे मंदिर जटोली शिव मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. जटोली हे नाव भगवान शिवाच्या लांब केसांवरून पडले आहे. आशियातील सर्वात उंच शिवमंदिर म्हणून ओळखले जाणारे हे मंदिर खरोखरच वास्तुशिल्पाचा चमत्कार आहे. जाटोली शिव मंदिर हे सोलनच्या प्रसिद्ध पवित्र स्थानांपैकी एक आहे इथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी जमतात. हे मंदिर शहरापासून फक्त 6 किमी अंतरावर आहे.
या मंदिराची उंची सुमारे111 फूट आहे. मंदिराची इमारत ही बांधकाम कलेचे एक वैशिष्ट्य आहे. जाटोली शिवमंदिराच्या इतिहासाशी अनेक पौराणिक कथा व आख्यायिका निगडीत आहेत. हे भगवान शिवाच्या सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक आहे जिथे एक प्राचीन शिवलिंग बऱ्याच काळापासून ठेवलेले आहे. पौराणिक कालखंडात भगवान शिव येथे आले होते अशी आख्यायिका आहे आणि हे मंदिर एकेकाळी भगवान शंकराचे विश्रामस्थान होते.हे मंदिर पूर्ण होण्यासाठी सुमारे 39 वर्षे लागली
हे मंदिर विशिष्ट दक्षिण-द्रविड वास्तुशैलीमध्ये बांधले गेले आहे आणि ते सलग तीन पिरॅमिडने बनलेले आहे. पहिल्या पिरॅमिडवर गणेशाची मूर्ती तर दुसऱ्या पिरॅमिडवर शेष नागाची मूर्ती दिसते. मंदिराच्या ईशान्य कोपर्यात 'जल कुंड' नावाचे पाण्याचे झरे आहे, जे गंगा नदीसारखे पवित्र मानले जाते. या कुंडाच्या पाण्यात असे काही औषधी गुणधर्म आढळतात, ज्यामुळे त्वचारोग दूर होतात.