येथे रामाला ‍देतात बंदुकांची सलामी

देशाचे हृदय म्हटल्या जाणार्‍या मध्ये प्रदेशातील टिकमगढ जिल्ह्यातील ओरछा हे ठिकाण ऐतिहासिक तसेच धार्मिक नगरी म्हणून प्रसिद्धीस आले आहे. येथे असलेल्या राजा राम मंदिरामुळे त्याचे महत्त्व आणखीनच वाढले आहे. येथे भगवान राम देव म्हणून नाही तर राजा म्हणून विराजमान आहेत व त्यांच्यासाठी सूर्योदय व सूर्योस्ताला मध्य प्रदेश पोलिस बंदुकींच्या फैरी झाडून सलामी देतात. गेली अनेक वर्षे ही परंपरा पाळली जाते. तसेच येथे येणार्‍या भाविकांना प्रसाद म्हण़न नाही तर राजशिष्टाचार म्हणून विडा देण्याची प्रथाही आहे.
या मंदिराची हकीकत अशी सांगतात की महाराणी गणेशकुंबवर ही मोठी रामभक्त होती. तिने अयोध्येत जाऊन शरयू तीरावर मोठी साधना केली, इच्छा एकच होती, रामलल्लाचे दर्शन व्हावे. पण ते काही होईना तेव्हा निराश झालेल्या महाराणीने शरयूत उडी घेतली. नदीत आत बुडल्यावर तिला रामाचे दर्शन झाले. रामाने तिची इच्छा विचारली तेव्हा बालरूपात तुम्ही माझ्याबरोबर ओरछा येथे यावे असे तिने सांगितले.
 
राम बालकरूपात तिच्यासोबत महालात आले व तिने त्या बालकाला खाली ठेवले तेव्हा त्याची मूर्ती बनली. तेव्हापासून हा राजवाडा मंदिर बनला. यावेळी येथे राजा मधुकरशाहचे राज्य होते. अर्थात येथील राजा म्हणून रामाला मान मिळाला. परिणामी त्याचे मंदिर एखाद्या किल्ल्यप्रमाणेच आहे. भाविकांचा असाही विश्वास आहे की या राममूर्तींचा डावा पायाचा अंगठा ज्याला दिसेल त्याच्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होतात.

वेबदुनिया वर वाचा