प्रॉन्स टोस्ट

PR
साहित्य : 1 वाटी पांढरी कोळंबी, 1 अंडे, दोन टी स्पून आलं-लसूण पेस्ट, एक चमचा मिरे पूड, मीठ, तीळ, तेल, ब्रेडसलाइस.

कृती : कोळंबीचा मधला धागा काढून स्वच्छ धुऊन आता कोळंबी, अंड्याचा बलक, आलं-लसूण पेस्ट, मिरे पूड व मीठ घालून पेस्ट करून घ्यावे. त्यात पाणी घालू नये. ब्रेडचे स्लाइस घेऊन मधून उभे दोन भाग करून घ्या. ब्रेडच्या स्लाइसवर पेस्ट दाटसर लावून त्यावर तीळ पसरावे. कढईत तेल गरम झाल्यावर पेस्ट लावलेली बाजू खालच्या बाजूला घालून टोस्ट तळून घ्या. चटणी किंवा सॉसबरोबर सर्व्ह करा.

वेबदुनिया वर वाचा