मतदार 90, मतं 181- आसाममध्ये निवडणूक अधिकारी निलंबित

मंगळवार, 6 एप्रिल 2021 (09:25 IST)
आसाममध्ये विधानसभा निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीसाठी 1 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातलं मतदान झालं. पण यात एका मतदान केंद्रावर मोठा घोळ झाला आहे.
 
दिमा हसाओ जिल्ह्यातील एका मतदान केंद्रावर फक्त 90 मतदारांची नोंदणी होती. पण या ठिकाणी 181 मतं पडली. हे प्रकरण गंभीरतेने घेत निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे. हाफलांग विधानसभा मतदारसंघात हे मतदान केंद्र येतं.
 
निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 1 एप्रिलला गेल्या आठवड्यात गुरुवारी मतदान झालं. 2016 मध्ये या मतदारसंघातून भाजपचे भीरभद्र हगजेर हे विजयी झाले होते. त्यावेळी 74 टक्के मतदान झालं होतं. निवडणूक आयोगाने आसाममधील 6 निवडणूक अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती