अरबी समुद्रातील 'माहा' चक्रीवादळाची तीव्रता कमी होऊन त्याचे रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झाल्याने गुजरातच्या किनारपट्टीवरचा संभाव्य धोका टळला आहे. दीवच्या किनारपट्टीपासून 90 किलोमीटर आणि वेरावळपासून 100 किलोमीटरवर हे चक्रीवादळ पोहोचले आहे.
'कयार' या चक्रीवादळापाठोपाठ आलेल्या 'माहा' या चक्रीवादळाने अतितीव्र स्वरूप धारण केले होते. हे चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता होती.
हवामान विभागाकडून गुजरातमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आल्यानं गुजरात सरकारकडून नागरिकांच्या स्थलांतरासाठीची तयारी करण्यात आली होती. तसेच राज्यातील आपत्ती निवारण यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली होती.
मात्र, या चक्रीवादळाची तीव्रता कमी होऊ लागल्याने गुजरात राज्यात किनारपट्टीजवळ राहणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला.