'कोरोना'च्या संकटकाळात विरोधकांनी एकजूट दाखवावी आणि सरकारला सहकार्य करावं, असं आवाहन मुख्यमंत्री वारंवार करत आहेत. अशातच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची घेतलेली भेट किंवा उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषदेवरील नियुक्तीविरोधात हायकोर्टात दाखल झालेली याचिका, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी भाजपच्या राजकारणावर संताप व्यक्त केला आहे.
'राज्य कोरोनाशी लढत आहे आणि भाजपच्या नेत्यांना राजकारणाचं पडलं आहे. त्यासाठी कधी राज्यपालांना भेटतात, तर कधी कार्यकर्त्यांच्या आडून कोर्टात जातात. पण कोर्टानेच स्वप्नभंग केल्याने आता तरी सुधरा!' असा सल्ला रोहित पवार यांनी ट्विटरवरून दिला आहे.