रशियामध्ये इमर्जन्सी लँडिंग दरम्यान विमानाला लागली आग, ४१ प्रवाशांचा मृत्यू

रशियाची राजधानी मॉस्को विमानतळावर रविवारी इमर्जन्सी लँडिंग करताना एका प्रवासी विमानाला आग लागली. या दुर्घटनेत दोन मुलांसह 41 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची तपासणी करत असलेल्या अधिकार्‍यांनी ही माहिती दिली.
 
सोशल मीडियावर उपलब्ध फुटेजमध्ये एअरोफ्लोट सुखाई सुपरजेट 100 विमान शीरीमीमेटयेवो आतंरराष्ट्रीय विमानतळावर उतरना पेटलेला दिसला. प्रवाशी विमानापासून निघून लांब पळ काढताना दिसले.
 
मॉस्कोच्या शीरीमीमेटयेवो विमानतळावर लँडिंग करत असताना विमानाच्या मागच्या बाजूने अचानक पेट घेतला. 
 
मॉस्कोवरुन या विमानाने रशियाच्या म्युरमॅनस्क शहरासाठी उड्डाण केले होते. उड्डाण केल्यानंतर बिघाड झाल्यामुळे लगेचच हे विमान पुन्हा विमानतळाच्या दिशेने फिरले. यात 73 प्रवाशी, 5 क्रू मेंबर्स असे 78 लोक प्रवास करत होते. यातून 37 लोक सुरक्षित बचावले गेले आहे. 
 
दुर्घटनेचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती