मुंबईतले अर्ध्याअधिक मृत्यूया पाच वॉर्डांमधून

बुधवार, 27 मे 2020 (14:41 IST)
कोरोना व्हायरसच्या संसर्गाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत मृत्यूंची संख्या आता एक हजाराहून अधिक आहे. मुंबई शहराच्या 24 वॉर्डांपैकी 5 वॉर्ड असे आहेत जिथे सर्वाधिक मृत्यूची नोंद होत आहे. मुंबई शहरात होणारे 50 टक्यांहून अधिक मृत्यू हे या पाच वॉर्डातले असल्याची माहिती समोर आली आहे.  
 
एल वॉर्ड म्हणजेच कुर्ला, साकीनाका याठिकाणी आतापर्यंत एकूण 154 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर एकूण रुग्ण 1,667 इतके आहेत.
 
इ वॉर्ड म्हणजेच भायखळा, मुंबई सेंट्रल याठिकाणी आतापर्यंत एकूण 129 जणांचा कोरोना व्हायरसची लागण झाल्याने मृत्यू झालाय. तर एकूण रुग्णसंख्या 1,726 इतकी आहे.
 
एच ईस्ट म्हणजेच वांद्रे,सांताक्रूझ या भागात 116 जणांचा मृत्यू झाला असून 1,680 इतके रुग्ण आहेत.
 
एम ईस्ट म्हणजेच गोवंडी, मानखूर्द परिसरात आतापर्यंत 108 जणांचा मृत्यू झाला असून 1,140 रुग्णसंख्या आहे.
 
पाचवा वॉर्ड के ईस्ट म्हणजे अंधेरी पश्चिम परिसरात 103 जणांचा मृत्यू झाला असून 1,623 इतके कोरोनाचे रुग्ण आहेत.
या डेटानुसार 57 टक्यांहून अधिक मृत्यू हे या पाच वॉर्डातले आहेत. पण कोरोनाचे कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे या पाच वॉर्डातले नसून जी नॉर्थ वॉर्डमध्ये आहेत.
 
या वॉर्डअंतर्गत कंटेनमेंट झोन असलेला धारावी परिसर येतो. दोन हजारहून अधिक रुग्णसंख्येची नोंद या वॉर्डात असून 85 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आलीय.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती