COVID-19 : केरळमध्ये दारू न मिळाल्यामुळे आत्महत्या – 10 बळी

सोमवार, 30 मार्च 2020 (12:04 IST)
केरळमध्ये रविवारपर्यंत 200 पेक्षा जास्त कोविड 19 - रुग्णांमध्ये केवळ एक मृत्यू झाला आहे. कोविड 19 मुळे झालेल्या दुसर्‍या मृत्यूच्या घटनेची पुष्टी झालेली नाही. परंतु दारूची उपलब्धता न झाल्यामुळे राज्यात 10 मृत्यूंची नोंद झाली आहे.

त्यापैकी आत्महत्येची सात प्रकरणे
एक हृदयविकारामुळे 
आफ्टरशेव्ह लोशन प्यायल्यामुळे मरण पावलेला एक
सॅनिटायझर घेतल्यानंतर मरण पावलेला एक
आत्महत्येच्या प्रकरणांचा तपशील
1.       बिजू विश्वनाथन (50), कोल्लम जिल्हा
2.       के सी विजिल (28), कन्नूर जिल्हा
3.       मुरली (44), एर्नाकुलम जिल्हा
4.       सनोज (37), थ्रीसुर
5.       सुरेश (वय 38), कोल्लम जिल्हा
6.       कृष्णकुट्टी, त्रिवेंद्रम जिल्हा
7.       वासू, एर्नाकुलम जिल्हा

कोल्लम येथील मुरलीधरन आचार्य यांचे रविवारी हृदयविकारामुळे निधन झाले जेव्हा त्याला दारूची बाटली सापडली नाही.
शनिवारी कायमकुलम येथील नौशादने दारू उपलब्ध नसताना शेव्हिंग लोशनचे सेवन केल्यानंतर प्राण गमावले.
पलकक्कड येथील रामनकुट्टी यांचा सॅनिटायझर घेतल्यानंतर मृत्यू झाला.
दारू न मिळाल्यामुळे निराश झालेल्या कोट्टयममधील एका इमारतीतून उडी घेतलेल्या एका 46 वर्षीय व्यक्तीने जीव गमावला.

केरळ मानसिक आरोग्य सर्वेक्षण, 2018 च्या मते, जवळजवळ , 50,000 पुरुष अल्कोहोलशी संबंधित समस्यांनी ग्रस्त आहेत. शिवाय, त्यापैकी जवळपास 10,000 ते 15,000 लोकांना मद्यपान, फिट, भ्रम आणि नैराश्यासारख्या गंभीर समस्या यांना उद्भवू शकतात.

मुख्यमंत्री पिनाराय विजयन यांनी शनिवारी सांगितले की ज्यांचे दररोज  दारूशिवाय होत नसेल त्यांना लवकरच  उत्पादन शुल्क विभागाकडून कायदेशीररीत्या निश्चित कोटा योग्य डॉक्टरांचा वैद्यकीय प्रशस्तिपत्रानुसार देण्यात येईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती