केरळात 3 वर्षाच्या मुलाला कोरोना

सोमवार, 9 मार्च 2020 (12:18 IST)
केरळच्या एर्नाकुलम येथे एका 3 वर्षाच्या मुलालाही कोरोना विषाणूची लागण झाल्याच समोर आले आहे. हा मुलगा नुकतंच आपल्या कुटुंबीयांसोबत इटलीहून परतला होता. मुलाला एर्नाकुलम मेडिकल कॉलेजच्या आयसोलेशन वार्डमध्ये ठेवण्यात आले आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार हा मुलगा आपल्या पालकांसोबत इटलीला गेला होता. 7 मार्च रोजी इटलीहून हा मुलगा पालकांसोबत दुबईला आला. यानंतर कोचीला आल्यानंतर विमानतळावर त्यांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर रिपोर्टनुसार तीन वर्षांच्या मुलाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाने हाहाकार माजला. देशात आतापर्यंत कोरोनाचे 40 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी सर्वाधिक रुग्ण केरळचे आहेत. सर्वात आधी केरळहून तीन रुग्ण आढळले होते, त्यांच्यावर उपचार करुन त्यांना सोडण्यात आले होते. त्यानंतर देशातील प्रत्येक विमानतळावर येणार्‍या प्रत्येक प्रवाशांसी तपासणी केली जात आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती