आमदार संजय गायकवाड यांनी कोव्हिड रुग्णांना चिकन बिर्याणी आणि अंडी वाटली

सोमवार, 17 मे 2021 (15:18 IST)
रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी मांसाहार करण्याचा सल्ला देणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांनी आता कोव्हिड रुग्णांना चिकन बिर्याणी आणि उकडलेली अंडी दिली आहेत. 
 
केंद्र सरकारच्या आवाहनानंतर बुलडाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनीही काही दिवसांपूर्वीच कोव्हिड रुग्णांनी चिकन, अंडी, मासे असा आहार घ्यावा असं म्हटलं होतं. यामुळे रुग्णांची प्रतिकार क्षमता वाढण्यास मदत होते असंही ते म्हणाले होते. पण यावरून त्यांच्यावर टीकाही करण्यात आली.
 
काही वारकऱ्यांकडून संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेण्यात आला.
 
संजय गायकवाड यांनी बुलडाण्यातील स्त्री रुग्णालयात कोव्हिड रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना चिकन बिर्याणी आणि उकडलेल्या अंड्यांचे वाटप केलं आहे. तसंच मासांहार करण्याचे फायदे सांगितल्याने कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, असं सांगत संजय गायकवाड यांनी या विषयाचं ज्यांनी राजकारण केलं त्यांची मात्र माफी मागणार नाही, असंही स्पष्ट केलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती