मराठा क्रांती ठोक मोर्चा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार

मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आम्ही २८८ जागांवर उमेदवार उभे करणार आहोत. आम्हाला आरक्षण दिलं गेलं मात्र आजही मराठा समाजाच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो आहे, प्रवेश प्रक्रियांमध्ये त्रुटी आहेत. त्यामुळेच येत्या विधानसभा निवडणुकीत मराठा क्रांती मोर्चा आपले उमेदवार उभे करणार आहेत. मराठा मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनीसदरची  माहिती दिली.
 
शिवछत्रपतींचा आशीर्वाद घेऊन हे सरकार सत्तेवर आलं. मात्र सत्तेवर आल्यावर या सरकारला मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला. सत्ताधारी काय आणि विरोधक काय सगळे एकाच माळेचे मणी असल्याचीही प्रतिक्रिया पाटील यांनी दिली. गेल्या ३० वर्षांपासून अधिक काळ मराठा समाजाला आरक्षणाचे गाजर दाखवून फक्त राजकीय फायद्यासाठीच सर्व पक्ष या समाजाचा वापर करुन घेत आहेत. केंद्रात आणि राज्यातले मराठा लोकप्रतिनिधीही मराठा समाजाच्या मागण्यांचा पाठपुरावा करत नाहीत. त्यामुळेच आम्हा मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फेच निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचा निर्णय आम्ही घेतल्या माहिती मराठा क्रांती मोर्चातर्फे देण्यात आली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती