आदित्य ठाकरे मुंबई उपनगरचे पालकमंत्री

गुरूवार, 9 जानेवारी 2020 (10:15 IST)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची नियुक्ती केली आहे. अजित पवार याच्याकडे पुणे जिल्ह्याचं तर आदित्य ठाकरे यांच्याकडे मुंबई उपनगर जिल्ह्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाण्यासह गडचिरोलीचं पालकमंत्रिपद आहे.
 
दिलिप वळसे-पाटील यांच्याकडे सोलापूरचं, तर बच्चू कडू यांच्याकडे अकोल्याचं पालकमंत्रिपद असेल. जयंत पाटील सांगलीचे, सुभाष देसाई औरंगाबादचे, शंकरराव गडाख उस्मानाबादचे, अमित देशमुख लातूरचे, तर यशोमती ठाकूर अमरावतीच्या पालकमंत्री असतील. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती