पॅन क्रमांक चुकल्यास 10,000 रुपये दंड

गुरूवार, 5 डिसेंबर 2019 (11:03 IST)
कोणताही फॉर्म भरताना चुकीचा पॅन (Permanent Account Number) क्रमांक दिल्यास 10,000 रुपये दंड आकारला जाणार आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने पॅन-आधार इंटरचेंजिबिलिटी संबंधित नियमांना अधिकृत केलं आहे. 
 
एखादा फॉर्म भरताना पॅन क्रमांक देणं अनिवार्य असेल आणि तुम्ही चुकीचा क्रमांक दिला, तर 10,000 रुपये दंड द्यावा लागणार आहे.
 
आयकर विभागाकडे जवळपास 20 कामांसाठी पॅन क्रमांक अनिवार्य करण्यात आला आहे. यामध्ये बँक खातं उघडणं, म्युच्युअल फंड खरेदी करणं आदी कामांचा समावेश आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती