कांद्याच्या दरात वाढ, लवकरच गाठणार शंभरचा आकडा! सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार झळ

बुधवार, 6 नोव्हेंबर 2019 (16:35 IST)
देशात कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळं सामन्यांच्या डोळ्यात कांद्यांच्या किमतींनी पाणी आणले आहे. महाराष्ट्रातील लासलगावसह पिंपळगाव बाजारात कांद्यांचे दर प्रचंड भडकले आहेत. दरम्यान केंद्र सरकारच्या वतीनं काद्यांची आयात मोठ्या प्रमाणात वाढवल्यामुळं येत्या काळात कांद्याच्या दरात घट होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आसला आहे. मात्र सरकारनं सामन्यांना दिलासा दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कांद्याचे दर १० टक्क्यांनी वाढले आहेत.
 
कांद्यानं लासलगावसह पिंपळगाव बाजारात सहा हजाराचा टप्पा गाठला. मात्र मंगळवारी दोन्ही बाजार समितीत कांद्याचे भाव एक हजार प्रति क्विंटलनं घसरल्यामुळं शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. तर, किरकोळ बाजारात प्रतिकिलो ७० ते  ८० रुपयांच्या घरात पोहचले आहेत. मात्र लवकरच हा कांदा शंभर गाठणार आहे. त्यामुळं ग्राहकांना मोठा फटका बसू शकतो.
 
किरकोळ बाजारात गेल्या तीन महिन्यात कांद्यांच्या घाऊक बाजारात चारपटीनं दरात वाढ झाली आहे. दरम्यान व्यापाऱ्यांनी गेल्या वर्षी कांद्याचे उत्पादन कमी झाल्यामुळं दर भडकल्याचे तर, यंदा अवकाळी पावसामुळं कांद्याचे भाव वधारले आहेत. दुसरीकडे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारच्या तुलनेत लाल कांद्याचे भाव मात्र ६५० रुपयांन वधारले आहेत.
 
केंद्र सरकारनं अफगाणिस्तान, तुर्की आणि इरानमधून कांद्याची मोठ्या प्रमाणावर आयात करणार आहे. मात्र असे असले तरी सध्या कांद्याचे दर वाढल्यामुळं सामन्यांच्या डोळयात पाणी आणले आहे. नाफेडचे प्रमुख लवकरच नाशिकमध्ये जाऊन व्यापारांशी याबाबत सविस्तर चर्चाही करणार आहेत. तर दोन आंतरराज्यमंत्री ६ आणि ७ नोव्हेंबरला कर्नाटक आणि राजस्थानला जाणार आहेत. त्यामुळं कांद्याच्या आयाती बरोबरच साठा वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती