मुलींसाठी राजमाता जिजाऊंच्या गुणांशी संबंधित यूनिक नावे
मंगळवार, 17 जून 2025 (15:16 IST)
राजमाता जिजाऊ, ज्यांचे पूर्ण नाव जिजाबाई भोसले, या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या माता होत्या. त्यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी सिंदखेडराजा, बुलढाणा येथे झाला. त्या लखुजी जाधव यांच्या कन्या होत्या आणि शहाजी भोसले यांच्या पत्नी होत्या. जिजाऊंनी शिवाजी महाराजांना स्वराज्याची संकल्पना, नीतिमत्ता, धैर्य आणि नेतृत्वगुणांचे संस्कार दिले. त्यांनी शिवाजी महाराजांना मराठा साम्राज्याच्या स्थापनेसाठी प्रेरित केले आणि त्यांच्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या बुद्धिमत्तेने, दूरदृष्टीने आणि कणखर स्वभावामुळे त्या मराठ्यांच्या इतिहासात आदरणीय आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जातात.
राजमाता जिजाऊंच्या नावावरुन मुलींसाठी काही खास आणि युनिक नावे:
जिजा: हे नाव खूप लोकप्रिय आणि सोपे आहे. जिजाऊंच्या नावावरुन हे नाव मुलींसाठी ठेवले जाते.
मिहिका : अतिशय यूनिक या नावाचा अर्थ दिव्य चैतन्य शक्ती असा आहे.