संस्कृत भाषेचे ज्ञान

गुरूवार, 5 डिसेंबर 2019 (11:47 IST)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना स्वतंत्र भारताची नवीन राज्यघटना तयार करण्याबाबत घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्षपदी नियुक्त केले गेले.//
 
अनुसूचित भाषांची यादी तयार करण्याची वेळ आली तेव्हा बाबासाहेबांनाही त्यातील सर्व भाषांची माता संस्कृत असे द्यायची फार इच्छा होती पण काही सदस्यांच्या विरोधामुळे हे शक्य झाले नाही. पण त्या काळात श्री लाल बहादूर शास्त्री आणि आंबेडकर ह्यांच्यात संस्कृत भाषे संदर्भात चर्चा झाली. त्या वेळी विरोधकांच्या लक्षात आले की दोन महान व्यक्ती संस्कृतभाषेत संभाषण करीत आहेत.
 
शास्त्रीजींना संस्कृत भाषेचे ज्ञान असणे अपेक्षित होते, परंतु अशिक्षित दलित कुटुंबात जन्मलेल्या बाबासाहेबांचा संस्कृत भाषेवर प्रभुत्व असेल हे कोणालाही अपेक्षित नव्हते. ह्या मुळे ही माहिती लवकरच पसरली. त्या दिवसापासून  सर्व आंबेडकरांच्या ज्ञानावर विश्वास ठेवू लागले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती