डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ज्ञानाचे प्रतिक म्हटले जाते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगातील सर्वाधिक शिकलेल्या व्यक्तींपैकी एक आहेत व त्यांनी एकूण ३२ पदव्या मिळवलेल्या आहेत.
इ.स. २०११ मध्ये, इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापीठाने डॉ. आंबेडकरांवर केलेल्या संशोधननानुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ज्ञानक्षेत्रांतील तब्बल ६४ विषयांचा गाढा अभ्यास (मास्टरी) होता, जगाताच्या इतिहासात अन्य कुणाचेही एवढ्या विषयांत प्रभुत्व नव्हते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर देशभरात अनेक गोष्टी आहेत जसे उद्यान, गावे, शहरे व स्थळे, कारखाने, ग्रंथालय/वाचनालय, चौक व रस्ते/महामार्ग, दवाखाने, पक्ष, संस्था व संघटना, प्रतिष्ठान, देश- विदेशातील पुतळे, पुरस्कार व पारितोषिके, पुस्तके, चित्रपट, नाटकं, मालिका, बौद्ध विहारे, मंडळे, योजना, वसतिगृहे,विमानतळे, विद्यापीठे व शैक्षणिक संस्थाने, सभागृहे व भवने, संमेलने, वास्तू स्मारके, स्थानके, स्टेडियम, इतर.