डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार

रविवार, 14 एप्रिल 2024 (07:15 IST)
तुम्ही किती अंतर चालत गेलात यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात हे अधिक महत्वाचे आहे.
 
मी अश्या धर्मला मानतो जो स्वतंत्रता, समानता, आणि बंधुता शिकवतो.
 
आकाशातील ग्रह तारे जर माझं भविष्य ठरवत असतील तर माझं मनगट आणि मेंदूचा काय उपयोग.
 
बुद्धीचा विकास करणे हेच मानवाचे नेहमी ध्येय असले पाहिजे.
 
स्वतःच्या नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या मजबुती वर विश्वास ठेवा.
 
स्वतःची लायकी विध्यार्थी दशेतच वाढवा.
 
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पेईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.
 
कोणत्याही समाजाची उन्नती त्या समाजाच्या प्रगतीवर अवलंबून असते.
 
माणसाला दारिद्र्याची नव्हे तर त्याच्या दुर्गुणांची लाज वाटली पाहिजे.
 
शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा.
 
रोग झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा रोग होऊच नये अशी व्यवस्था करावी.
 
अत्याचार करणाऱ्या पेक्षा अत्याचार सहन करणारा गुन्हेगार असतो.
 
जो व्यक्ती स्वतःच्या मृत्यूला नेहमी लक्षात ठेवतो, तो नेहमी चांगले कार्य करतो.
 
सर्वात आधी आणि सर्वात शेवटी आपण एक भारतीय आहोत.
 
माणूस धर्माकरिता नाही, धर्म माणसाकरिता आहे.
 
माणसाने खावे जगण्यासाठी, पण जगावे समाजासाठी.
 
जेथे एकता तेथेच सुरक्षितता.
 
काम लवकर करावयाचे असेल तर मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका.
 
जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही आणि जो मरायला भितो तो आधीच मेलेला असतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती