आशिया चषक 2022 च्या शेवटच्या लीग टप्प्यातील सामन्यात, पाकिस्तानने हाँगकाँगचा 155 धावांनी पराभव केला.प्रथम फलंदाजी करताना मोहम्मद रिझवान आणि फखर जमान यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 20 षटकांत 2 गडी गमावून 193 धावा केल्या.प्रत्युत्तरात हाँगकाँगचा संघ 10.4 षटकांत केवळ 38 धावा करू शकला.
प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्तान संघाला बाबर आझमच्या रूपाने पहिला धक्का बसला.बाबर आझम 9 धावा करून बाद झाला.यानंतर रिझवान आणि फखर जमानने डाव सांभाळला.या दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 81 चेंडूत 116 धावांची भागीदारी झाली.फखर जमान 41 चेंडूत 53 धावा करून बाद झाला. मोहम्मद रिझवानने 57 चेंडूत 78 धावा केल्या.खुशदिलने 15 चेंडूत 35 धावांची दमदार खेळी खेळली.हाँगकाँगकडून एहसान खानने 2बळी घेतले.
आशिया चषक 2022 मध्ये, ग्रुप स्टेजचा शेवटचा सामना पाकिस्तान आणि हाँगकाँगमध्ये खेळला जात आहे.श्रीलंकेने गुरुवारी बांगलादेशचा पराभव करून सुपर-4 साठी पात्रता मिळवली, तर पाकिस्तान आणि हाँगकाँग यांच्यातील आजचा सामना जिंकणारा संघ सुपर-4मध्ये पोहोचणारा शेवटचा संघ असेल आणि रविवारी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाशी सामना होईल. शुक्रवारी होणाऱ्या पाकिस्तान आणि हाँगकाँगच्या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल.