ईस्टर

ईस्टर दरवर्षी निश्चित तारखेला ने येता एकवीस मार्च नंतर पहिल्यांदा पूर्ण चंद्र दिसल्या नंतरच्या पहिल्या रविवारी ईस्टर येतो. ईस्टर हा ख्रिश्चन बांधवांचा महत्वपूर्ण सण आहे. 
 
महाप्रभु येशु यांनी मृत्यु नंतर तीन दिवसांनी परत जन्म घेतला असल्याचे मानण्यात येते. या आनंद दिवसाच्या स्मृती प्रित्यर्थ संपूर्ण ख्रिश्चन बांधव दर वर्षी हा सणं साजरा करतात. हा सण वसंत ऋतु मध्ये येतो. 
 
वसंत ऋतुत सृष्टी सौदर्याने बहरलेली असते. ईस्टर दरवर्षी निश्चित तारखेला न येता एकवीस मार्च नंतर पहिल्यांदा पूर्ण चंद्र दिसल्या नंतरच्या पहिल्या रविवारी ईस्टर येतो. हा शब्द जर्मनीतील ईओस्टर शब्दातून घेतला आहे. 
 
याचा अर्थ आहे 'देवी'. खिश्चन बांधवांचे श्रद्धे नुसार महाप्रभु येशु जीवंत असून महाशक्तिशाली आहे, येशु त्यांच मन आनंदीत करून त्यांच्यात उमेद व साहस जागवतात. 
 
यामुळेच त्यांना दुख: सहन करण्याची शक्ती प्राप्त होते. ईस्टर नाताळ प्रमाणे धूमधडाक्यात साजरा करण्यात येत नसला तरी ईस्टरचे वेगळे महत्व आहे. ईस्टरच्या अगोदर येणारया शुक्रवारी ख्रिश्चन बांधव 'गुडफ्रायडे' साजरा करतात. 
 
या दिवशी प्रभु येशु यांनी क्रुसवर लटकविण्यात आले होते. ख्रिश्चन बांधी काळे वस्त्र परिधान करून आपला शोक व्यक्त करतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती