अशी आहे टीम जी आर्थिक नियोजन करणार

बुधवार, 15 एप्रिल 2020 (07:33 IST)
कोरोनाच्या संकटानंतर आणखी एक संकट येणार आहे. हे संकट आर्थिक असणार आहे. त्यामुळे त्याचा सामना करण्यासाठीही आपण आतापासूनच तयारी करायला हवी. त्यासाठी आपण दोन गट तयार केले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रीगट तयार करण्यात आला आहे. त्याचं काम सुरु झालं आहे. म्हणजे लॉकडाऊन हळूहळू शिथिल करताना कसा शिथिल करावा, कोणाला परवानगी द्यायची, किती प्रमाणात परवानगी द्यायची, आपलं नेमकं आर्थिक धोरण काय असावं, काय खबरदारी घ्यावी, आणखी काय उपाययोजना करायला हव्यात याचा संपूर्ण अभ्यास ही मंत्र्यांची टीम करेल. ”
 
मुख्यमंत्र्यांची टीम अशी  
 
डॉ. रघुनाथ माशेलकर, विजय केळकर, दिपक पारेख, अजित रानडे, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील मंत्रीगट
 
आपण वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनाही एकत्र केलं आहे. डॉ. रघुनाथ माशेलकर यांची ओळख करुन देण्याची गरज नाही. आपणा सर्वांना माहिती आहे. अशी अनेक नामवंत मोठी माणसं आपल्या महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्राचे हे सर्व वीरपूत्र, काही आपल्या भगिणी आहेत अशा सर्वांची एक टीम केली जात आहे. माशेलकर यांचा तंत्रज्ञान क्षेत्रात कुणी हात धरु शकत नाही. त्यांच्यासोबत विजय केळकर, दिपक पारेख, अजित रानडे असे काही नामवंत अर्थतज्ज्ञ देखील आहेत. यांची एक टीम तयार केली आहे, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती